You are currently viewing लाहोरी चिकन कराही! (कढाई)

लाहोरी चिकन कराही! (कढाई)

बाहेरगावी असताना‌ एकदा लाहोरी कराही खाल्ली होती. जेव्हा कढईत प्लेटिंग केलेली चिकन कराही आणि रोटी आली तेव्हा त्यात दिसणा-या तेलाचे प्रमाण पाहता जरा कसेसेच झाले. कुठच्या कुठे ऑर्डर केले असे वाटत असतानाच पहिला घास घेतला तेव्हा ती सौम्यशी अप्रतिम चव अगदीच आवडली.

टाॅमेटोचा tangy पणा, धणा पावडरची slight note आणि कुठेतरी खड्या मसाल्यांचा हलका स्वाद हर एक घासागणिक रेंगाळत होता. तिखटपणाचा लवलेशही नव्हता. एकदा ही डिश युट्यूबवर पाहून अभिने घरी बनवली. अगदी तीच पद्धत खाली दिली आहे. बनवायच्या अनेक विविध पध्दती आहेत पण ह्याप्रकारे बनवल्यानंतर आम्ही बाहेर खाल्लेल्या चवीच्या जवळपास नेणारी चव असलेली चिकन लाहोरी कराही तयार झाली.

साहित्य लागणार आहे:

– १ किलो चिकन. Leg pieces ना कट मारून घ्यायचे. बाकी curry cut pieces.

– तब्बल अर्धा किलो टाॅमेटो (स्पेशल लाल टाॅमेटो जी साॅस ला वापरतात ती वापरली. उत्तम रंग, चव.)

– तेल जरा नेहमीपेक्षा जास्त लागते ह्या पाककृतीसाठी. चिकन व्यवस्थित तळले जाईल इतपत तेल.

– दीड टीस्पून काश्मिरी मिरची पावडर, एक टीस्पून चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद पावडर, एक टीस्पून धणा पावडर, काळे मिरे पावडर, गरम मसाला आणि अर्धा टीस्पून साबूत जीरा, मीठ

– ५ टेबलस्पून आंबट-गोडूस दही फेटलेले दही

– दोन हिरव्या वेलची, एक मसाला वेलची, एक इंच तज तुकडा आणि एक तमालपत्र

– आले, कोथिंबीर आणि ५-७ कमी तिखट मिरच्या

सगळी कृती मध्यम आणि मोठ्या आचेवर करायची आहे. मी कोरीया वरून Griddle आणले होते. उत्तम पसरट कढई आहे. त्याचा लाहोरी चिकन करही बनवण्यासाठी वापर करतेय. तुम्ही जाड बुडाची कढई वापरू शकता.

– कढईत अंदाजाने थोडे जास्तीचे तेल घाला. साधारण तापत आले की आच मध्यम ठेऊन, सगळे चिकन कढईत टाकून अगदी १० मिनिटे परतून घ्या. अडीच टीस्पून आले लसूण भरड टाकून मिक्स करून घ्या. दोन हिरव्या वेलची, एक मसाला वेलची, एक इंच तज तुकडा आणि एक तमालपत्र परता.

– पाच मिनिटांनी बारीक चिरलेले टोमॅटो टाकून वरखाली करत व्यवस्थित परतून घ्या.

– पाच मिनिटांनंतर एक टीस्पून काश्मिरी मिरची पावडर, एक टीस्पून चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद पावडर, एक टीस्पून धणा पावडर आणि अर्धा टीस्पून साबूत जीरा टाकून (कच्चे मी पण प्रथमच वापरले), गॅस मोठा करून परतून घ्या. मध्यम आच करून पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या. झाकण काढून पाहिल्यानंतर चिकन आणि टाॅमेटो उत्तम शिजलेले दिसेल. रस देखील असतो. गॅस मोठा करून चांगले परतायचे.

– पाच टेबलस्पून आंबट- गोडूस दही छान फेटून चिकनमधे मिक्स करून घ्यायचे.

– सहा ते सात कमी तिखट हिरव्या मिरच्या तिरके कट मारून कापून घ्या, matchstick julienne type मधे दीड इंच आले कापून घ्या. आणि मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्या. हे सर्व चिकन मधे टाकून परतून घ्या. गॅस मध्यम आणि मोठा ठेवतच सारे परतायचे आहे.

– पाच- सहा मिनिटांनी वरून एक टीस्पून गरम मसाला, पाव टीस्पून काश्मिरी मिरची पावडर आणि पाऊण टीस्पून काळेमिरे पावडर टाकून परता.

– कोथिंबीर आणि एखाद्या मिरचीचे तुकडे भुरभुरवा.

बटर रोटी आणि लच्छा कांदा सोबत फारच चविष्ट लागतो हा चिकन लाहोरी कराही.

#लाहोरीचिकनकराही#lahorichickenkarahi#karahichicken

+2

Leave a Reply