You are currently viewing तिरफळं!

तिरफळं!

तिरफळं!

अख्ख्या मसाल्यांबाबत आपण लिहीतोय. त्या भागातील, साबुत मसाल्यातील तिरफळांबाबत काही माहिती ह्या पोस्ट मधे आहे. तुम्हाला देखील काही अवांतर माहिती वैगरे माहित असल्यास कृपया नक्की comments मधे लिहा. 🙏🏻🙂 (गेल्यावर्षीची पोस्ट. थोडी editing करून पोस्ट करते आहे.)

मसाल्यांमधे वापरली जाणारी तिरफळं. Sichuan pepper. महाराष्ट्रात विशेषतः कोकणी- मालवणी स्वयंपाकातील माशांच्या तिखले- कालवणात तिरफळाचा आवर्जून वापर होतो. आणि मला कधीतरी कोणी सांगितले होते की कारवारी स्वयंपाकातही तिरफळे वापरतात. माशांचा ओशट वास जरा कमी होतो आणि पचनक्रिया सहज होते. रोजच्या वापराचे जे बेगमीचे वर्षभराचे मसाले असतात त्यात कोकणी- मालवणी मसाला असल्यास त्यातही थोडेसे तिरफळ घालतात.

आईने कोकणी पध्दतीने बनवलेले, तिरफळे घातलेले बांगड्याचे हळदीच्या पानातले तिखले असो वा सुरमई- कोलंबीची आमटी, त्याची भन्नाट चव अगदी हवीहवीशी वाटते. कोकणातल्या आचिर्णे गावावरून मोठ्या मामांनी मागे कधीतरी पाठवलेली सुकी तिरफळे आईनी छान डब्यामध्ये भरून ठेवली आहेत. कधी डबा खोलला कि earthen notes असलेला गंध दरवळतो.

तर ही हिरवीगार तिरफळे साधारण हिरव्या वाटाण्याएवढी असतात. रंग गडद हिरवट- olive green जसा. जरासे Grainy texture. झुपका असतो छान ह्या berries चा. चवीला म्हणाल तर citrus सारखे आंबटसर- तिखट! तीव्र notes. म्हणजे मी सहज म्हणून दाताखाली एक ओले तिरफळ फोडताच तीव्र चवीचा एक प्रवाह जीभेवर रेंगाळला‌. अगदी पाणी पिऊन सुद्धा तसाच राहिला बराच काळ.

पक्व फळांना ऊन दिले असता ते दुभागतात. मधली काळी बी दिसू लागते. पुर्ण सुकले असता कडक काळे तिरफळ तयार होते. बी पडून जाते. कधी साल सुकते वेळी बी आतल्या बाजूला जास्त दुमडली गेली तर बी खुळखुळ्यासारखी आतच अडकते. सहज काढता येते. वृक्ष काटेरी असतो आणि लहान काटे असतात ह्याच्या छोट्याशा काड्यांवरदेखील. सोबत upload केलेल्या एका व्हिडिओ मधे तुम्ही पाहू शकाल.

तिरफळं वापरताना अनेक जण बी काढुन टाकतात. बहुतेकदा रोजच्या वापराचे मसाले बनवताना, इतर मसाल्यांच्या प्रमाणाच्या तुलनेत तिरफळाचे प्रमाण अगदीच नगण्य असते मग बी काढली, नाही काढली तरी विशेष फरक पडत नाही.

तांदळाला किड लागू नये म्हणून तांदळात टाकण्यासाठी अनेक जण तिरफळं घेऊन जातात.

कोकणात आणि तळकोकणात ब-याच ठिकाणी तिरफळाचे वृक्ष आढळून येतात.

ओल्या तिरफळाची एक पाककृती मिळाली आहे. जमल्यास बनवून पोस्ट नक्की करते.

तिरफळांना‌ अनेक जण त्रिफळ संबोधतात. मीसुद्धा त्रिफळंच बोलायचे. कारण व्यापारी जगात तिरफळांचा बहुतेकदा त्रिफळ म्हणून उल्लेख असतो. आयुर्वेदात वापरले जाणारे त्रिफळा चूर्ण हे पुर्णपणे वेगळे असते. फेसबुकच्या Dinesh Shinde ह्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर मी जमेल तसे आमच्या लेबल्स वर वैगरे बदल करत आहोत.

आवड असल्यास तिरफळावरचा मिलिंद ह्यांचा लेख नक्की वाचा! लिंक खाली आहे.

https://www.facebook.com/100013784170305/posts/917277145408416/?mibextid=Nif5oz

(Please note:

Rustic holidays हे मामाचे गाव म्हणून लोकप्रिय असलेल्या Home stay च्या शिल्पा ताईंनी ह्या महिन्यात झाडावरची तिरफळे काढली. छान हिरवीगार फळे. आपल्यासाठी ती शिल्पादिदींनी छान‌ पॅक करून विरार ला पाठवली, म्हणून‌ Video मधे दाखवता आली. त्यांनी काही फोटो पण पाठवले आहेत ते त्यांच्या नावासह पोस्ट केले आहेत. शिल्पादिदी प्रयोगशील वृत्तीच्या आहेत. आपल्या ग्रुपवर छान छान‌लेख लिहीतात. Rustic holidays लाल अशी अनेक सेंद्रिय उत्पादने त्या घेतात. होमस्टे देखील सुंदर आहे.)

#तिरफळ#कोकण#kokan#tirphal#triphal#sichuanpepper#masala#wholespices#spicesofindia#spicesofkokan

Leave a Reply