You are currently viewing तवसाचे पातोळे

तवसाचे पातोळे

तवसाचे पातोळे हे कोकणातील लोकप्रिय आणि पारंपारिक महाराष्ट्रीयन पक्वान्न आहे. हे हळदीच्या पानांत बांधून केले जाते आणि विशेषतः श्रावण महिना, गणपती उत्सव किंवा अन्य सणांच्या निमित्ताने बनवले जाते.

दि मसाला बझार स्टोअरला आपल्यासोबत काम करणा-या मनिषा अभ्यंकर (जोशी) यांनी दापोलीतल्या त्यांच्या माहेरी बनत असलेल्या तवसाच्या पातोळ्यांची पाककृती दिली होती.

त्यांच्याकडे गणपती उत्सवात बनते ही पातोळी…

एडवणला घरचीच हळदीची छान छान‌ ताजी पाने मिळाली. Highway वरून येताना ग्रामीण भागातील महिलांकडून ताजे चिबूड आणि तवस उचलले.

साहित्य:

1. तवसा (एका मोठ्या काकडीचा तवसाचा कीस) – साधारण 1 कप

2. गूळ – 1/2 कप

3. तांदळाचे पीठ – 1 कप (आम्ही आमच्या सहेली उत्पादनांमधील खास बासमती मोदक पीठ वापरले आहे. सुवासिक आणि छान पीठ आपल्याकडे बनवतो.)

4. मीठ – चिमूटभर (ऐच्छिक)

5. वेलची पूड – 1/4 टीस्पून (आमची लक्ष्मी मसालेची उत्तम दर्जाची वेलची पावडर आम्ही वापरली आहे.)

6. हळदीचे पाने (घरच्याच हळदीची पाने मिळाली)

7. तुप

कृती:

1. तवसाची साले काढून, बिया देखील काढायच्या आणि किसून घ्यायचा. गुळ बारीक चिरायचा.

२. एका भांड्यात तवसाचा किस आणि गूळ घेऊन हाताने मिसळून घ्यायचे. ते एकत्र झाले कि कढईत तुप घालून, त्यात हे मिश्रण घालून, परतून घ्यायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवर थोडा वेळ शिजवायचे. मिश्रण छान मिळून आल्यावर त्यात आमच्या लक्ष्मी मसालेची वेलची पूड घातली. (नाही घातली तरी चालते.)

2. आमच्या सहेली उत्पादनांमधील बासमतीचे मोदक पीठ घेतले. उत्तम सुगंधित पीठ असते हे. मिश्रणातच बासमती तांदूळ पीठ घालून भागवायचे. मंद आचेवर वाफ काढायची.

3. पीठ गरम असतानाच पाण्याचा हलका हात लावत मळून घ्यायचे.

4. हळदीची पाने अर्धी कापून घ्यायची. तुपाचा हात लावायचा पानाला आणि मिश्रण छान लावून घ्यायचे. पान दुमडायचे. अशी सर्व पाने तयार करून मोदकपात्रात लावून घ्यायची. दणदणीत वाफ काढायची १५ मिनिटांची. इतका सुरेख असा हळदीच्या पानांचा सुगंध दरवळतो कि काय सांगू.

5. तयार पातोळे केळीच्या पानांत छान रचायचे. पाने उघडून आतले लुसलुशीत पातोळे मस्त खायचे.‌ तवस म्हणजे काकडीचा हलकासा स्वाद, मिळून आलेला पीठ- गुळाचा गोडवा ह्याने चविष्ट लागते ही कोकणी पाककृती.

मुळात सहज- सोपी आहे.

#पातोळी#तवस#काकडी#cucumber#Tawas#laxmimasale#themasalabazaar#kokan#kokani

Leave a Reply