आंबा पिकणे हंगाम सुरू झाला की आमच्याकडे बनतो एक आंबट, गोड, हलकासा तिखट असा एक पदार्थ- आंब्याची बाठवणी म्हणजेच Mango-Curry! आता हा पदार्थ Side dish नसून main course म्हणजेच मुख्य जेवणामधे गणला जातो. हा पदार्थ कोकणी कि वाडवळी लोक नेहमी बनवतात पण बनवायच्या पध्द्तीमधे फरक असल्याने चवीतही वेगळ्या लागतात.
साहित्य:
१. सहा रसाळ मध्यम आकाराचे आंबटगोड चवीचे पिकलेले आंबे. लहान घेतले तरी चालतील.
स्वच्छ धुवून साले काढून घ्या.
२. एक दोन आंब्याचा पिळून काढलेला रस
३. एक वाटी खवलेल्या नारळाचे दुध किंवा अगदी बारीक वाटलेला
४. अर्धी वाटी खिसलेला गुळ
५. १०-१२ कढीपत्त्याची पाने
६. ४ हिरव्या लाल मिरच्या उभी चिर पाडून व एक सुकी रेशमपट्टा मिरची किंवा बोर मिरची
७. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
८. आलेलसूण पेस्ट एक चमचा
९. चवीपुरते मीठ
१०. पाव चमचा हिंग
१३. एक लहान चमचा मध्यम तिखट अशी बेडगी मिरची पावडर
१४. सेलम हळद पावडर
१५. राई व जीरे आणि ५-६ काळेमिरे फोडणीसाठी
१६. एक लहान चमचा धणा-जिरे पावडर
चला तर मग पटापट आंब्याची आंबट, गोड, हलकीशी तिखट अशी बाठवणी बनवूया.
एका जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून राई-जीरा-हिंग-काळेमिरे-कढीपत्ता आणि मिरच्यांची खमंग फोडणी करायची. एक सुकी रेशमपट्टा मिरची परतून आलेलसूण पेस्ट टाकून चांगली शिजवायची. मीठ, बेडगी मिरची पावडर, सेलम हळद, धणा-जिरे पावडर मिसळून व्यवस्थित परतायचे. खिसलेला गुळ घालून एक वाफ काढायची. आणि सोललेले आंबे घालून परतून घ्यायचे. (कांदा पर्यायी आहे.)
आंब्याचा रस ओतून सर्व एकदम नीट परतायचे. आणि पाच मिनिटांनंतर खवलेल्या ओल्या खोबऱ्याचे दुध घालायचे. एक-दोन उकळी आल्यावर की गॅस बंद करायचा. मस्त जाडसर चटकदार पिवळा रस्सा तयार झाला असेल.
बारीक चिरलेली कोथिंबीर वरून भिरभिरवा. आणि वाफाळता भात किंवा चपातीसोबत छान लागते. अप्रतिम संमिश्र चव रेंगाळेल आणि ह्या रश्श्यात ओथंबलेला आंब्याचा प्रत्येक Bite बाठवणी पदार्थांची रंगत वाढवतो.
#आंब्याची_बाठवणी#mango_curry#local_recipes#edwan#एडवण#bathavani#riped_mango recipes
– Food Memories Marinated with Love by, स्नेहा चौधरी- इंदूलकर