Simple Tossed Salad!
१. १५० ग्रॅम भिजवलेले काबुली चणे, मीठ आणि चिमुटभर साखर टाकलेल्या थोड्याशा पाण्यात उकडवून घ्यायचे.
२. थोडे थंड झाल्यावर पॅनमधे थोड्याशा ऑलिव्ह ऑईल मधे तीन-चार काळिमिरे आणि दहा बारा लसूणाच्या पाकळ्या मस्त लालसर होईस्तोवर परतायच्या. त्यातच अगदी बारीक चौकोनी कापलेल्या कैरीला परतायचे आणि हे सारे भांड्यात काढायचे.
३. त्याच पॅनमधे उकडलेले काबुली चणे मोठ्या आचेवर पटापट परतायचे. जराशी काश्मिरी मिरची पावडर आणि चाट मसाला भुरभुरावायचा. चणे थोडे तांबूस व्हायला हवेत. मग लसूण- कैरी काढलेल्या भांड्यात हे चणे काढायचे.
४. एक कांदा- एक टाॅमेटो- मुठभर कोथिंबिर शक्य तेवढी बारीक कापायची. ह्यात मिक्स करायची. लिंबाचा रस आणि वाटल्यास थोडे मीठ मिसळायचे. हलक्या हाताने मिक्स करायची.
५. पातीचा कांदा भुरभुरायचा आणि मस्त चटकदार कोशिंबीर/ Salad चा आस्वाद घ्यायचा!
चटकदार, पौष्टीक का काय ते हेच! Loved this one though!