You are currently viewing Pineapple तवा पुलाव 🍍

Pineapple तवा पुलाव 🍍

 पाईनअॅपल तवा पुलाव

#pineapple_tawa_pulav

तवा पुलाव हे आपल्या मुंबईच्या रस्त्यांवर आवडीने आनंद घेऊन खाल्ले जाणारे लोकप्रिय असे Street Food!

फोडणीभाताच्या प्रकारात मोडणारे पण अनेक भाज्यांच्या वापराने चवीला अजून चटपटीत. आमच्या विरारमधील The Greenroof ह्या Fastfood joint ला अनेक पदार्थांसोबत तवा पुलावचेही पाच-सहा प्रकार आहेत.  झटपट आणि चविष्ट म्हणून तवा पुलाव आवडीने ओरपला जातो. 

एकदा Pineapple तवा पुलावाबाबत हाॅटेलच्या तवा पुलाव “मारणा-या” (बनवणा-या) कारागिर कुक ने सांगितले होते. तेव्हा हा Pineapple Tawa Pulav बनवला. छानच लागला म्हणून घरगुती twisted Recipe तुमच्यासोबत शेअर करते. (PLASE NOTE: सध्याच्या आमच्या मेन्युमधे हा पदार्थ नाही)

तवा पुलाव ला शक्यतो ५-६ तास शिळा भात वापरावा. रोजच्या वापरातील तांदूळ असला तरी चालेल किंवा आवडत असल्यास बासमतीही वापरू शकता. हा सुटसुटीत मोकळा झाला पाहिजे. हवे तर तयार भाताला पाण्याने एकदा दोनदा स्वच्छ धुवा म्हणजे starch निघून जाऊन भात मोकळा होईल.

मोकळा सुटसुटीत भात: दोन कप

आलेलसूण पेस्ट एक चमचा

एक मोठा कांदा बारीक चिरून

मटार दाणे थोडेसे

एक गाजर लहान चौकोनी तुकडे करुन

एक भोपळी मिरची लहान चौकोनी तुकडे करुन

एक मोठे टाॅमेटो बारीक तुकडे करून

अर्धा कप अननसाचे बारीक तुकडे

कोथिंबीर बारीक चिरून

अर्धा चमचा जीरे

एडवणच्या लक्ष्मी मसालेची सेलम हळद पावडर: अर्धा चमचा

एडवणच्या लक्ष्मी मसालेचा स्पेशल गरम मसाला: एक चमचा

एडवणच्या लक्ष्मी मसालेचा पावभाजी मसाला: दीड चमचा

एडवणच्या लक्ष्मी मसालेची बेडगी मिरची पावडर: एक चमचा

(तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रॅण्ड चे मसाले वापरू शकता.)

चवीपुरते मीठ

चिमुटभर साखर

एका लिंबाचा रस

तेल व अमुल बटर

एक मोठी कढई तापवत ठेवा. त्यात तेल गरम करा. जी-याची फोडणी द्या. मग कांदा तळून गुलाबीसर झाला कि आलेलसूण पेस्ट टाकून परता. मग सेलम हळद, बेडगी मिरची पावडर, गरम मसाला, पावभाजी मसाला, मीठ व चिमूटभर साखर घालून व्यवस्थित परता. आता सगळ्या कापलेल्या भाज्या व अननसाचे तुकडे टाकून परता. लिंबूरस ओता. कोथिंबीर पण मिक्स करा. बटर टाकून वितळू द्या. थोडावेळ भाज्या शिजल्या कि मोकळा भात टाकून वरखाली करत सर्व भाज्या व भात मस्त मिसळू द्या. थोडा वेळ गॅसवर वरखाली करा आणि जबरदस्त असा तवा पुलाव तय्यार. 

अननस कापतानाच दोन तुकडे करून कापला आणि मधला गर काढून घेतला. उरलेल्या दोन रिकाम्या अननसाच्या खोलगट भागात मस्तपैकी अननस तवा पुलाव वाढला. कोथिंबीर भुरभुरली. 

तवापुलावसोबत तळलेला उडदाचा पापड, लोणचे आणि रायते दिले जाते. पाईनअॅपल तवा पुलाव म्हणून मी सोबत पाईनअॅपल दही रायते आणि तोंडी लावण्यासाठी ‘पाईनअॅपल-चिझ क्युब-चेरी’ स्टिकस बनवल्या होत्या.

अननसातच वाढल्यामुळे छान वाटत होता तवा पुलाव आणि चवीलाही झक्कास! मग करून पहाच.

#तवा_पुलाव #अननस #pineapple recipes #tawa_pulav #tawapulav #pineapple_tawapulav #raita #laxmi_masale #laxmi_masale_edwan #the_masala_bazaar #spice_blends #garam_masala #greenroof #hotel_greenroof