सहेली महिला गृहउद्योगाची नव्या वास्तूत शुभारंभ:
आज अक्षयतृतीया मुहूर्तावर मम्मी- अस्मिता अरविंद चौधरी च्या सहेली महिला गृहउद्योगाच्या चार नविन गाळ्यां चे गणेशपूजन आणि सुरूवात झाली. अजूनही गाळ्यां चे काही काम बाकी आहे पण शुभमुहूर्तावर आज शुभारंभ केला.
१९९५ पासून सहेली महिला गृहउद्योगाला सुरूवात झाली. कैरी, लिंबू, मिरची, मिक्स प्रकार, भोकर, करवंद, आंबेहळद, लसूण, कारले अशी आंबट- गोड, तिखट अशा निरनिराळ्या प्रकारातील शाकाहारी लोणची, सुके कोलीम, सुके बोंबील आणि कोलंबी चे अशी मांसाहारी लोणची, लसूण चटणी, खोबरे चटणी, शेंगदाणा चटणी, कढीपत्ता चटणी अशा लज्जतदार चटण्या, तोंड-लावणीचे पदार्थ, विविध प्रकारच पीठे आणि पापड वैगरे वाळवणाचे प्रकार यांचे उत्पादन आणि विक्री केली जाते.
याव्यतिरिक्त देखील काही अन्य उत्पादने घेतली जातात. दुकान, विविध स्टाॅल्स, सेल्समन व्दारा उत्पादनांची विक्री होते.
आम्ही लहान असताना मम्मीने सुरू केलेला हा सहेली गृह उद्योग व्यवसाय, तीने नेटाने घर प्रपंच आणि बाबांचा मसाल्यांचा व्यवसाय सांभाळत वाढवला. सतत नविन प्रशिक्षण घेत, अभ्यास करत ह्या व्यवसायात ती चांगले बदल करत गेली. खाजगी असो किंवा शासकीय प्रशिक्षणे मम्मी अगदी तन्मयतेने तिथे हजेरी लावून शिकून घेत असे. सहकारी महिलांना कधी प्रेमाने तर कधी दटा वून, उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करत असे. ह्या वयात देखील, नविन तंत्रज्ञान वापरुन काही करता येईल का ह्याकडे कल असतो मम्मीचा! बाबांनी देखील तिच्या धडपडीला नेहमीच पाठिंबा दिला. We are very proud of you Mumma! Congratulations for extended workplace! All the blessings…
आजपासून स्वतंत्र गाळ्यांमधे उत्पादन आणि विक्रीचा शुभारंभ होईल. लवकरच पुर्ण सेट अप तयार झाले की पुढच्या पोस्ट मधे update करूच. ग्राहकांच्या शुभेच्छा आणि प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. हे शुभाशिर्वाद कायम असू द्यात. एडवणच्या दुकानांमध्ये मसाला खरेदीला आल्यास नविन जागेला देखील भेट नक्की द्या!