You are currently viewing बटर चिकन

बटर चिकन

‘बटर चिकन’ हा सामिष असणा-या अनेकांच्या आवडीचा पदार्थ. चवीला गोडूस-tangy- light note of spice and flavourful असे हे बटर चिकन, पहिल्यांदा करताना कटकटीचे वाटू शकते पण एकदा का सोप्या स्टेप्स कळल्या कि नंतर पटकन जमते. ही पाककृती बनवायच्या पध्दतीही अनेक आहेत पण मला शेफ संज्योत कीर च्या सहज शैलीत दाखवलेल्या रेसिपीज मनापासून आवडतात म्हणून थोडेसे twist करून पण त्याने दाखवल्याप्रमाणे बनवले आहे.

साबूत काश्मिरी मिरची आणि पावडर ह्याचा तीन वेळा म्हणजे तीन स्टेप मधे ह्या रेसिपी मधे वापर झाला. बाकी साबूत मसाले अगदी ५-६ वेलदोडे, अर्धा इंच दालचिनी तुकडा, एखादीच मसाला वेलची, जीरे, १०-१२ काळे मिरे इतकेच‌ काय ते लागले. छान नारिंगी- हलका लालसर रंग येतो ग्रेव्हीला..‌ आणि दरवळता सुगंध. जे शाकाहारी आहेत ते पनीर ग्रील करून अगदी असेच बटर पनीर बनवू शकतात.

ज्यांना बोनलेस आवडते, ते बोनलेस चिकन वापरू शकतात. खास करून बोनलेस chicken breast or Thigh part वापरले जातात. आम्ही deep incision करून with bone prefer करतो.

STEP 1:

१. अर्धा किलो चिकनला

– चवीनुसार मीठ, अर्धा टिस्पून हळद, एक टेबलस्पून आले पेस्ट, एक टेबलस्पून लसूण पेस्ट, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव वाटी कसूरी मेथी, एक टेबलस्पून धणा पावडर, पाऊण टेबलस्पून जीरा पावडर, एक टेबलस्पून काश्मिरी मिरची पावडर, पाऊण टेबलस्पून लक्ष्मी मसालेचा तंदूरी मसाला, अर्ध्या लिंबूचा रस, पाऊण वाटी दही, राईचे तेल

वरील सर्व अगदी चांगले मिक्स करून ते अर्धा किलो चिकनला लावून व्यवस्थित मॅरिनेट करत ठेवावे. साधारण १ तास ठेवले किंवा overnight fridge मधे ठेवले तरी उत्तम.

– मॅरिनेट झालेल्या चिकनला, छान ग्रील करून घ्यायचे. आणि बोनलेस असेल तर साधारण लहान तुकडे करून ठेवायचे.

STEP 2:

मुख्य ग्रेव्ही:

– दोन मोठे कांदे उभे कापून,‌ तीन‌ मोठे चांगले टाॅमेटो, तीन मिरच्या, ६-७ लसूण पाकळ्या, एक इंच‌ आले, १५-२० काजू, पाव वाटी कसूरी मेथी, अर्धी वाटी कोथिंबीर, पुदीना पाने, ४-५ साबूत काश्मिरी मिरची, ५-६ वेलदोडे, अर्धा इंच दालचिनी तुकडा, एखादीच मसाला वेलची, दीड टेबलस्पून जीरे, १०-१२ काळे मिरे आणि अर्धा पॅकेट अमुल बटर

– वरील पदार्थांतील खडे मसाले थोड्या तेलात परतायचे आणि मग कांदा, टाॅमेटो, आले- लसूण, काजू व इतर सर्व घटक चांगले परतून घ्यायचे. अमुल बटर आणि थोडेसे फ्रेश क्रिम टाकून मिसळून घ्या.

मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून अगदी महीन वाटून घ्यायचे. आणि मोठ्या गाळणीतून हे वाटण गाळून घ्यायचे.

STEP 3:

जाड बुडाच्या कढईत थोड्याशा तेलावर जीरे परतून घ्या. बारीक चिरलेला अर्धा कांदा परतून घ्या. अर्धा टिस्पून काश्मिरी मिरची पावडर, जराशी सेलम हळद पावडर, पाव टिस्पून जीरा पावडर, पाव टिस्पून धणा पावडर, पाव टिस्पून साखर (आवडीप्रमाणे जास्त पण टाकू शकता) हे परतून घ्या. व्यवस्थित शिजले कि त्यात STEP 2 मधे‌ बनवलेली ग्रेव्ही टाकून छान परतायचे. आणि १०- १५ मिनिटे छान उकळले कि मग STEP 1 मधे आपण ग्रील केलेले चिकनचे तुकडे ग्रेव्ही मधे टाकून पाच मिनिटे उकळायचे. सुरेख नारिंगी- लालसर ग्रेव्ही तयार असेल आणि दरवळही पसरला असेल.

थोडे बटर आणि थोडे Fresh cream टाकायचे. कसूरी मेथी हातावर चुरून मस्तपैकी भुरभुरायची.

सर्व्ह करताना बटर चिकन डिश मधे वाढून, त्यावर garnishing साठी fresh cream आणि कोथिंबीर टाकायचे. घरच्या kitchen garden मधली इवलीशी टवटवीत कोथिंबीर छानच वाटत होती.

बटर रोटी‌ आणि जीरा राईस सोबत मस्त लागते बटर चिकन…

अजून काही tips असतील तरी नक्की कळवा! 😀

#बटरचिकन#butterchicken#chickenrecipes#food#laxmimasale#themasalabazaar#spices

Leave a Reply