वाडवळी सुक्के चिकन
– साधारण अर्धा किलो चिकन
– दोन बटाटे (मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून)
– एक मोठा कांदा बारीक चिरून
– लक्ष्मी मसालेचा डंकावरचा वाडवळी मसाला (दीड- दोन चमचे) तुम्ही कोणताही रोजच्या वापरातील वाडवळी मसाला वापरू शकता.
– तेल गरजेप्रमाणे आणि मीठ चवीनुसार
– ५-६ काळेमीरे, दोन लवंगा, दोन तमालपत्र, एक बादियान, एक मसाला वेलची आणि २ हिरव्या वेलची, एक इंच दालचिनी चे दोन तुकडे, जरासे जीरे
– लक्ष्मी मसालेची सेलम हळद पावडर अर्धा चमचा
– लक्ष्मी मसाले ची काश्मिरी मिरची पावडर अर्धा चमचा (ऐच्छिक)
– लक्ष्मी मसालेचा गरम मसाला अर्धा ते पाऊण चमचा
– एक वाटी सुके खोबरे, किसून, कढईत परतून लालसर झाले कि मिक्सरमधून फिरवून बारीक करून घेणे.
स्वच्छ धुवून घेतलेल्या चिकनला आणि बटाट्यांच्या फोडींना जरा जाडसर वाटलेले आले-लसूण भरड, मीठ, हळद, वाडवळी मसाला आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरवत ठेवावे.
तापलेल्या तेलात फोडणीला खडा मसाला घालून परतायचे. थोडे साजूक तूप पण टाका. बारीक चिरलेले ३-४ कांदे टाकून अगदी चांगले परतून घ्यायचे. थोडी आले लसूण भरड, वाडवळी मसाला टाकून परतायचे. मुरवत ठेवलेले चिकन टाकून परतायचे. झाकणामधे वाफेवर पाणी ठेवायचे. दहा मिनिटांनी वाफेवर ठेवलेले झाकणातील थोडे थोडे पाणी घालून चिकन परतून घ्या. भाजलेले- बारीक केलेले सुके खोबरे टाकून परतावे. परत झाकण ठेवावे.
चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत थोडे थोडे पाणी घालत वाफेवर शिजवावे. चिकन शिजल्यावर वरून गरम मसाला घालून एकदा वाफ काढावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. भाकरीसोबत चविष्ट लागते.