You are currently viewing तरले/ तरळे

तरले/ तरळे

Low glycemic index आणि फायबरयुक्त Palm sprouts/ Palmyra sprouts म्हणजेच स्थानिक भाषेत तरले/ तरळे!

आता थंडीच्या हंगामात गावच्या महिला विक्रेत्यांकडे तरले विकत मिळतात. पिवळ्या रंगाचे लांबट असे हे कंद. आमच्या पालघर पट्ट्यात मीठ आणि हळद टाकून तरले उकडून खाल्ले जातात. उकड-हंडी म्हणून संक्रांतीला एक पारंपरिक मिश्र भाज्यांचा पदार्थ आमच्याकडे बनतो त्यात हे तंतूमय तरले तुकडे करून टाकतात. काही ठिकाणी हे कंद सुकवून खातात. बरेच पौष्टिक गुणधर्म असल्याने‌ गावाकडे आवर्जून हे खाल्ले जाते.

ताडाचे झाड असते त्याचे मुळे/ कोंब असतात हे. ताडाची फळे म्हणजे ज्यातून ताडगोळे (Ice apples) निघतात ती जमिनीवर पडून रूजतात. आणि कोंबासारखी मुळे फुटतात. ती म्हणजे तरळे. खोदून कढले जातात. काही ठिकाणी खास लागवड केली जाते असे ऐकले आहे.

साधारण मांसल तंतूमय असा गर असतो. चवीला साधारण कंदमुळांचा earthen flavour असलेला.

#तरले#तरळे#Palmsprouts#Palmyrasprouts#roots#कंदमुळे

Leave a Reply