You are currently viewing झटपट नारळवड्या

झटपट नारळवड्या

झटपट नारळवड्या

साध्या पण चविष्ट अशा नारळाच्या वड्या अगदी हव्या त्या प्रकारे हव्या त्या चवीच्या झटपट बनवता येतात. सोपा आणि घरी उपलब्ध साहित्यात होणा-या नारळवड्या लहानसहान sweet cravings साठी एक उत्तम पर्याय आहे!

नारळाचा खोवलेला किस मात्र ताजा आणि शुभ्रच वापरला कि छान लागतात वड्या! अगदी दोन तीन दिवसांनी देखील मऊ राहतात.

साहित्य काय लागते तर:

१. दोन वाट्या खवलेला नारळ (शक्यतो‌ शुभ्र नारळाचा किस)

२. एक ते सव्वा वाटी साखर

३. वेलची पुड आणि चिमुटभर मीठ

४. साजूक तूप

५. उकडलेला बटाटा बारीक खिसून (ऐच्छिक)

६. पाव वाटी दुध

७. काजू-बदाम तुकडे

चला नारळवड्यांची कृती पाहूया.

१. जाड बुडाच्या कढईत तुप तापवत ठेवून, त्यात खवलेला नारळाचा किस आणि उकडलेल्या बटाट्याचा कीस (हा ऐच्छिक आहे. ह्याने वड्या जास्त मऊ पडत नाहीत.) घालून दहा मिनिटे परतले. किस सुका पडणार नाही ह्याची काळजी घेत नीट परतले.

२. लगेचच साखर, चिमुटभर मीठ आणि दुध टाकून व्यवस्थित एकजीव केले.

३. वेलची पावडर आणि काजू-बदाम तुकडे घालून परतून मिसळून घेतले. हे सर्व मंद आचेवर केले.

जरा पाच दहा मिनिटे नीट शिजून झाले कि एका ताटाला तुप लावून लगेचच हे मिश्रण ताटात काढून वाटीने हलकेच दाब देत समप्रमाणात पसरवून घेतले. वरून अजून थोडे सुकामेव्याचे तुकडे पेरले आणि परत वाटीने अलगद हलक्या हाताने दाबले. लगेचच काप कापून घेतले नाहीतर अगदीच थंड झाल्यावर काप पाडणे कठिण होते,

ह्या वड्या ३-४ दिवस किंवा जास्तही बाहेर आरामात चांगल्या राहतात. जास्त दिवस ठेवायचे असल्यास फ्रिजमधे ठेवाव्या लागतात.

खुप प्रकार करता येतात ह्या नारळवडीमधे… गुलकंदाची, आमरसाची नारळवडी पण छान लागते. ज्या प्रकारात बनवायची आहे त्याचा रस किंवा ते जिन्नस साखर टाकतो त्यावेळी टाकावे, गोडपणा कितपत हवा तशी साखर किंवा रस adjust करून नीट मिसळावे. हापुसच्या आमरसाची तर अफलातून नारळवडी बनते.

#नारळवडी#naralvadi#sweets#coconut_recipes#naraliporninma

#simple_recipes

Leave a Reply