Modak Flour/ मोदकाचे पीठ
₹80.00 – ₹150.00
Description
लक्ष्मी मसाले व सहेली उत्पादने एडवण- पालघरचे मराठमोळ्या मोदकांसाठी, भाकरीसाठी आणि गणपती उत्सवासाठीचे खास चविष्ट घरगुती बासमती व इतर सुगंधित तांदूळ वापरून बनवलेले मोदक पीठ!
मोदकाच्या आवरणासाठी उकड काढण्यासाठी जितके तांदूळ पीठ तितके पाणी असे प्रमाण घ्यावे. जाड पातेल्यात २ कप पाणी उकळवताना त्यात १ चमचा तूप व चवीसाठी थोडे मिठ घालावे. पाण्याला उकळी येताच गॅस बारीक करून २ वाटी पिठ घालावे. कलथ्याने मिसळून बारीक आचेवर २-३ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी. छान दरवळ उठली असेल. गॅसवरून उतरवून ५ मिनीटे झाकून ठेवावे. गरम असतानाच वाटीने पीठ व्यवस्थित मोडून घ्यावे आणि तुपाचा हात लावून अगदी चांगले मळून घ्यावे.
सारणासाठी तुप गरम करून त्यात खसखस परतून, ताजा खवलेला नारळ आणि त्याच्या निमपट चिरलेला गुळ कढईत खरपुस परतावे. गुळ वितळला की खसखस, वेलची पावडर, सुकामेव्याचे काप व केशर काड्या मिसळून व्यवस्थित परतून ओलसर सारण करून घ्यावे.
उकडीतून छोटे गोळे घेऊन लाटून किंवा दोन्ही अंगठ्यांनी दाब देत बोटांनी फुलवत पारी करून, चिमटीने छान कळ्या पाडून त्यात सारण भरावे. मोदक वाळून घ्यावेत. मोदकपात्रात केळीची किंवा हळदीची पाने ठेवून त्यावर मोदक लावून पंधरा मिनिटे उकडून घ्यावे. पानात मोदक ठेऊन साजूक तुपाची धार सोडून नैवेद्य दाखवावा.
Additional information
Weight | N/A |
---|---|
Weight | 500 Gram, 1000 Gram |
Reviews
There are no reviews yet.