You are currently viewing विरार-आगाशी-अलिबाग स्पेशल मराठमोळे चिकन-पोहा भुजिंग / Grilled Poha Bhujing

विरार-आगाशी-अलिबाग स्पेशल मराठमोळे चिकन-पोहा भुजिंग / Grilled Poha Bhujing

विरार-आगाशी-अलिबागचे पोहा-भुजिंग ही इथल्या ठिकाणची favorite आणि signature dish! कधी विरार ला आलात कि आवर्जून आगाशीच्या ‘आगाशी भुजिंग सेंटर’ या पिढीजात उत्तम दर्जाचे भुजिंग बनवणा-या सेंटर ला भेट देऊन वेगवेगळ्या चिकन भुजिंगचा आस्वाद घ्यायला विसरू नका. एका रीलमधे ऐकले होते कि चिकन ‘भुजिंग’ नाव का पडले? तर चिकन भुजणे म्हणजे भाजणे. त्याचेच इंग्रजी थाटामधे क्रियापद लावून (example: Do- doing or Give – Giving) भुजणे- भुजिंग‌ असे नाव पडले.

ग्रिल चिकनच्या फ्लेवरमधे मुरलेले हे तिखटसर पोहे भुजिंग स्टार्टर म्हणून एक वेगळा आणि तेवढाच चमचमीत पदार्थ आहे. पोहे तर आपल्यापैकी बहुतेकांना आवडतात, पण भुजिंगसारख्या मसालेदार स्वरूपात ते अफलातून लागतात. काळेमिरेचा फ्लेवर जास्त असतो. पाहुणे आले किंवा एखाद्या कार्यक्रमाला तोंडी लावण्यासाठी पोहे-चिकन भुजिंगचा बेत ठरवून करू शकता. ब-याच वेगवेगळ्या पध्दतीने आणि निरनिराळे मसाले वापरून पोहा-चिकन भुजिंग बनवतात. Authentic recipe मागितल्यावर पटकन कोणी देतेच असे नाही. मीदेखील आधी वेगळ्या पध्दतीने बनवायचे आणि आता काही दिवसांपूर्वीच ही पाककृती मिळाली. काही दिवसांपूर्वी बनवले आणि खरेच अगदी आगाशी स्टाईल पोहा भुजिंग च्या चवीचे लागले.

खुप मसाल्यांचा भडीमार न करता, मोजक्या मसाल्यांचा चोख वापर ही भुजिंगच्या जमेची बाजू. चव अगदीच निराळी आणि tempting आहे. चिकन न खाणारे सोया चंक्स, बटाटे वापरून करू शकता.

पोहा- चिकन भुजिंग पाककृती:

– अर्धा किलो चिकन धुवून आणि पुर्ण निथळून घेतले. (Boneless पण वापरू शकता.) मध्यम आकाराचे तुकडे केले. मध्यम आकाराचे ३-४‌ बटाटे घेऊन, साले न काढता त्याचे थोडे जाडसर असे गोल काप कापले. मीठ, हळद, जीरा पावडर, धणा पावडर आणि आलेलसूण पेस्ट मिक्स करून चिकन व बटाट्यांना व्यवस्थित लावले. जरासे लिंबू पिळले. मी जास्त वेळ म्हणजे अगदी २ तास किंवा fridge मधे overnight मॅरिनेट करत ठेवते. म्हणजे चांगले juicy लागते आणि व्यवस्थित शिजते.

– मॅरिनेट झाल्यावर हे ग्रील करून घ्यायचे किंवा skewers‌ मधे चिकन/ बटाटे लावून हलकेच तेल लावून भाजायचे. Smoky flavour हवा असल्यास कोळशावर भाजत ठेवायचे. ९०% पर्यंत शिजणे महत्वाचे.

– मुख्य मसाल्यासाठी १०-१२ लसूण पाकळ्या, १/२ इंच तज, २‌ हिरव्या मिरच्या, ३-४ लवंगा, ३-४ हिरवी वेलची, १०-१२ काळे मिरे, १ तमालपत्र, सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी (चांगले भाजून घेतले आणि तुकडे केले. ह्याची भरड करून घेतली मिक्सरमधून. ह्या प्रमाणात मध्यम तिखट चिकन होते. अजून तिखट हवे असल्यास काळे मिरे, मिरची, लवंग प्रमाण वाढवू शकता. (मी कोथिंबीर देखील वापरली आहे. खरे तर गरज नाही)

– जाड बुडाच्या कढईत, तेल तापल्यावर दोन उभे चिरलेले कांदे अगदी छान पारदर्शक होईस्तोवर परतले. त्यात मुख्य मसाल्यांची भरड टाकून परतले आणि मध्यम आचेवर पाच- दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढली. ह्यात ग्रील चिकन आणि बटाटे टाकून चांगले वरखाली केले. आणि परत दहा मिनिटे झाकण ठेवून वाफ काढून चिकन शिजवले. चिकन नीट शिजलेय का ते पहायचे.

– दोन-तीन मुठी जाड पोहे न धुताच ह्यात मिसळायचे, सर्व चांगले वरखाली करायचे आणि पाण्याचा हबकारा मारायचा. काही जण पातळ पोहे देखील वापरतात. चवीनुसार कमीजास्त मीठ टाकून पाच मिनिटे झाकण ठेवून दणदणीत वाफ काढली कि भुजिंग तयार. दरवळ ही उठली असेल एव्हाना.

Chicken- Poha Bhujing is Ready to serve. पाच मिनिटांनी गरमागरम भुजिंग आणि लिंबाची फोड सर्व्ह करून आस्वाद घ्यायचा. This taste is different and unique some what way!

तुम्हाला अजून काही ह्यात माहित असल्यास comments मधून आम्हालाही कळवा.

आणि हो Good news is! The Masala Bazaar स्टोअर येत्या ४ ऑगस्ट’२४ ला दहा वर्षांचा पल्ला गाठतेय. त्यानिमित्ताने जे काही premium Spice blend range मसाले launch करतेय त्यात पोहा भुजिंग मसाला सुध्दा आहे. 100 Gram bottle packing मधे काही लिमिटेड स्टाॅक उपलब्ध असेल.

अर्थात Authentic flavourful साठी वर दिलेल्या scratch पासून केलेल्या पाककृती ला पर्याय नाही.

३ ऑगस्ट पासून स्पेशल ४ range आमच्या www.themasalabazaar.com वर‌उपलब्ध असेल. pre-bookings are on from 30th August’24! For cost of bottle and to know about range of products in this series, you can connect with us on WhatsApp 9890043675.

#भुजिंग#पोहाभुजिंग#भुजिंग#चिकनभुजिंग#लक्ष्मीमसालेएडवण#दिमसालाबझार#विरार#themasalabazaar#Happy10#TMBSpicelaunch

Leave a Reply