You are currently viewing पिकलेल्या हापुसचा मुरांबा 🥭

पिकलेल्या हापुसचा मुरांबा 🥭

पिकलेल्या हापुसचा मुरांबा 🥭

खुपच सोपा आणि चवीला लाजवाब असा हा सोनेरी छटेचा मुरांबा अगदी तासाभरात तयार होतो. नावाप्रमाणेच मुरत जाईल तसा अजूनच चविष्ट होतो.

आपल्याला लागतात: ३-४ हापुस आंबे, ३-४ लवंगा, आंब्याच्या फोडींइतकी साखर, ४-५ वेलदोड्याची भरड, केशलकाड्या

 • तीन ते चार मध्यम आकाराचे हापुस आंबे घेऊन एखादा तास पाण्यात ठेवावे. ह्याने त्यातील उष्णता निघून जाते, असे काही जणांनी सुचवले होते.

 • स्वच्छ पुसून साल काढून, आतल्या गराच्या मध्यम फोडी कराव्यात. अगदी बारीक फोडी केल्यास विरघळू शकतात.

 • हापुस गोडूस असल्याने मी जेवढ्या कापा तेवढीच साखर घेतली आणि कढईमध्ये फोडी आणि साखर हलक्या हाताने मिसळून एक तास ठेवून दिले.

 • एक तासाने कापांना साखरेचे छान पाणी सुटले, मग हे मिश्रण मंद आचेवर उकळत ठेवले.

 • साधारण वीस मिनिटात फेसाळ मिश्रण झाले. आच वाढवत कमी करत, हलक्या हाताने अधूनमधून हलवत राहिले. हळूहळू पुढच्या पंधरा वीस मिनिटात पाक पारदर्शक होऊ लागला. कडेने साचणारा पाक, कडा सोडवत राहीले.

 • केशर काड्या, ४-५ वेलच्यांची ताजी भरड-पुड, ३-४ लवंगा ह्यात घालून पाचेक मिनिटे मंद आचेवर ठेवले. आणि गॅस बंद केला.

 • मिश्रण थंड झाले की बरण्यांमधे मुरांबा भरून ठेवला.

सुंदर सोनेरी रंगाचा गोडगोड मुरांबा गरमागरम फुलका किंवा पोळीसोबत खाण्यास तयार आहे. 

अर्धकच्च्या आंब्याच्या फोडींचा मुरांबा देखील छान होतो. त्याची पाककृती जरा वेगळी आहे. तोतापुरी आंब्याचा छान मुरांबा होतो. लिंक खाली देते:

https://www.facebook.com/666217570131149/posts/3003427046410178/

#muramba #मुरांबा #मोरांबा #हापुस #मराठी